नांदेड जिल्हात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक

market

नांदेड – शेतकऱ्यांचा खरीब हंगामात तोंडावर आला आहे, पेरण्यासाठी पैसेची आवश्यकता आहे. ज्या शेतकऱ्यांनी कापूस, हरबरा शासकीय खरेदीसाठी ऑनलाईन केले त्याचा नंबर आल्यावर तो शेतीमाल घेऊन बाजर समिती व जिनिंगला शेतकरी जात आहेत त्यावेळी बाजरी समिती, जिंनिगवाले आणि अधिकारी (ग्रेडर) संगनमताने शेतकऱ्यांची लूट करत आहेत. माल खराब आहे म्हणून त्याच्याकडून आधीचे पैसे उखळून घेत आहेत आणि हमाल उरलेल्या मालाला हात लावू देत नाहीत काही शेतकऱ्यांचा माल घरी पाठवत आहेत अश्या प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे अशा घणाघाती आरोप रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी केला आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे लॉक डाऊन असल्याकारणे शेतीच्या मालाचे भाव उतरले आहेत, खरेदी करण्यासाठी कोणी व्यापारी तयार नाही.शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासकीय खरेदी चालू केली पण तिथे व्यापाऱ्यांचा माल नांदेड जिल्हातील बाजार समितीच्या सहमतीने सरास खरेदी चालू आहे, यात त्याची मिलीभगत आहे असा आरोप शिंदे यांनी केला आहे.

आमची लोकप्रतिनिधी व जिल्हा व तालुका प्रशासनाला विनंती यात लक्ष घाला व आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि मायबाप सरकारस विनंती आहे ज्या शेतकऱ्यांचा खरेदी शक्य नाही त्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत तात्काळ कापसासाठी २०००₹ रुपये व हरभऱ्यासाठी १०००₹ रुपयाचे अनुदान द्यावे व ज्या शेतकऱ्याचा माल खरेदी केलेला आहे त्या शेतकऱ्याचे अद्याप पैसे जमा झालेले नाहीत ते पैसे सुद्धा तात्काळ जमा करावे .

कर्जबुडव्या विजय मल्ल्या भारतात येताच त्याला सीबीआय रिमांडमध्ये घेणार ?

‘वादळाच्या संकटकाळी प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उभं रहावं’

महाराष्ट्राला मका आणि ज्वारी खरेदीसाठी केंद्र शासनाची परवानगी