पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना संपवून टाकू; अमेरिकेचा इशारा

वॉशिंग्टन : पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे अन्यथा ज्या ठिकाणी दहशतवादी लपलेले असतील. त्या ठिकाणी घुसून त्यांना संपवून टाकू, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी पाकिस्तानला दिला आहे.पाकिस्तान हे दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे.

bagdure

अशा स्थितीत बिगर `नाटो’ सहकारी देशांच्या सूचीत पाकिस्तानला मिळालेल्या विशेष दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि यावर चर्चा केली जाऊ शकते, असेही टिलरसन यांनी सांगितले.अमेरिकन नागरिक व त्यांच्या हिताचे रक्षण करणे हे आमच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना आश्रय देणा-या पाकिस्तानने याचा विचार करावा. दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी पाकिस्तानकडून पाठिंबा देण्याची अपेक्षाही टिलरसन यांनी व्यक्त केली. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला सशर्त सहकार्य दिले जाणार असल्याचेही टिलरसन यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...