नीरजला गोल्ड जिंकून देणाऱ्या भालाफेक कोचची हकालपट्टी

niraj chopra

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. कोच उवे यांच्या प्रशिक्षणात त्याने हे पदक पटकावले आहे. नीरज सोबत त्यांचेही देशभरातुन कौतुक केले गेले. मात्र आता त्यांचीच प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

जर्मनीचे माजी खेळाडू असलेले उवे भालाफेक क्रीडाप्रकारात १०० मीटरवर भाला फेकनारे पहिले आणि एकमेव खेळाडू आहे. २०१७ पासून ते नीरज सोबत जोडले गेले होते. २०१८ मध्ये जेव्हा नीरजने राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धा जिंकली तेव्हा उवेच त्याचे कोच होते. टोकियो ऑलिम्पिकसाठी त्यांची राष्ट्रीय कोच म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र आता खेळाडू त्यांच्या प्रशिक्षण खुश नसल्याचे समोर आले आहे. यामुळे खेळाडू आणि कोचेससोबत चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. उवेनंतर नवीन कोचचा शोध सुरु असल्याचे देखील एएफआयच्या योजना समितीचे प्रमुख ललित भानोत यांनी सांगीतले आहे.

नीरजने सुवर्णपदक जिंकल्याचे श्रेय उवे यांना दिले होते. उवे यांच्या मार्गदर्शनात नीरजने मोठ्या स्पर्धेत पदक जिंकले आहेत. मात्र आता त्यांच्या अचानक हाकलपट्टीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या