मुंबई : मार्च २०२० पासुन संपुर्ण देशाला कोरोना संसर्गाने ग्रासले आहे. या काळात मनोरंजन आणि क्रिकेट दोन्ही विश्व संपुर्णपणे ठप्प झाले होते. यात मनोरंजन क्षेत्राने ओटीटी प्लॅटफॉर्मचा पर्याय स्विकारला आणि तग धरण्याचा प्रयत्न केला. ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे यांने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल त्याचे मत मांडले आहे. यावेळी सुबोध म्हणाला की ‘मी स्वत: या माध्यमात काम न केल्यामुळे मला या माध्यमाचा अनुभव नाही. मात्र ज्या कलाकारांना मनोरंजानाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यची संधी मिळत नाही. त्या कलाकारासाठी हे उत्तम माध्यम ठरु शकते. नवोदीत कलाकारांसाठी हे उत्तम व्यसपीठ ठरत आहे.’ असे सुबोध भावे यावेळी म्हणाला.
यावेळी बोलताना सुबोध म्हणाला की,’या व्यासपिठावर मोठा चित्रपटच हवा असा इथे पर्याय नाही. तसेच ओटीटीवर प्रेक्षकांना हवे ते शो पाहण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच ओटीटीमध्ये प्रेक्षकांना त्यांच्या पसंतीनुसार भरपुर पर्याय उपलब्ध असतात. चित्रपटगृहात मोठ्या कलाकारांचे नाव बघुन प्रेक्षक जातात. मात्र ओटीटीवर नवोदीत कलाकारांना भरपुर संधी असते तसेच नवोदीत कलाकारांच्या कामाची दखल प्रेक्षकही आवर्जुन घेत आहेत.’ अशा प्रकारे सुबोध भावेने ओटीटीचे कौतुक केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘एक रुपयाची पेप्सी, अय्यर भाऊ…’ चाहत्यांच्या नारेबाजीचा व्हिडीओ शेअर करत श्रेयस अय्यरने दिले पुनरागमनाचे संकेत
- अतिरिक्त प्रभार सांभाळणाऱ्या मुख्याध्यापकांना विशेष वेतन देण्याची माध्यमिक शिक्षकभारतीची मागणी
- आमच्या पत्रांना हवं तर केराची टोपली दाखवा पण किमान जनतेच्या हिताचे निर्णय तरी घ्या : शेलार
- माणुसकी जिवंत आहे : आजीबाई पुरवतायत निराधार ज्येष्ठांना मोफत डबा !
- ख्रिस लिनने केले दिनेश कार्तिकला ट्रोल; कार्तिकने पण दिले ‘असे’ उत्तर