fbpx

नाशिक जिल्ह्यातील ९ हजार ८०० टन द्राक्ष निर्यात

द्राक्ष

लासलगाव  : द्राक्षाची पंढरी अशी ओळख असलेल्या जिल्ह्यातून या हंगामातील द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून ९८०० टन द्राक्षाची निर्यात झालेली असल्याची माहिती मिळाली आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातून या हंगामातील द्राक्ष निर्यातीत सुरुवात झाली असून ७४७ कंटेनर मधून ९८०० टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. यावर्षी द्राक्ष उत्पादकांना 60 रुपये ते 70 रुपये किलोने द्राक्षाचा भाव मिळत आहेत. मात्र मागील वर्षी ह्याच निर्यातक्षम द्राक्ष आला 90 रुपये ते 100 प्रति किलो भाव मिळत होता.

मागील वर्षीच्या तुलनेमध्ये द्राक्षाच्या दरामध्ये 25 ते 30 रुपये किलोमागे घट झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या द्राक्ष वर बांग्लादेशात शंभर टक्के आयात कयात येत असल्यामुळे बांगलादेशमध्ये आपल्याकडील द्राक्षाला चांगली मागणी असून देखील निर्यात होत नसल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे जर बांग्लादेशचे बाजार द्राक्षासाठी जर खुले झाले तर द्राक्षाला नक्कीच चांगले भाव मिळतील आणि शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील.

यावर्षी द्राक्ष उत्पादनात 40% हून जास्त घट झालेली आहे . त्यात या वर्षी द्राक्षाची भाव समाधान कारक नसल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. मागील वर्षी २०१६-१७ मध्ये नासिक जिल्ह्यातील द्राक्षाची ऐतिहासिक अशी १ लाख ३१ हजार टन द्राक्ष निर्यातची नोंद झाली होती. कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये ३.५ लाख एकर एकरमध्ये द्राक्षाची लागवड झाली असून त्यापैकी २ लाख एकर एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये झाली आहे. द्राक्ष उत्पादनासाठी नाशिक जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर आहे. देशातून होणाऱ्या एकूण निर्याती पैकी नाशिक जिल्ह्यातून ९० टक्के द्राक्ष हे निर्यात केले जातात. भारतातून निर्यात होणाऱ्या द्राक्षावर बांगलादेशमध्ये शंभर टक्के आयात शुल्क लावन्यात येत असल्यामुळे बांग्लादेश सारखी बाजारपेठेला मुकावे लागत आहे. त्यामुळे शासनाने त्यावरील आयात शुल्क रद्द करावा जेणेकरून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी व्यक्त केला.

सततचे प्रतिकूल वातावरण, वाढता उत्पादन खर्च आणि मजूरटंचाई या अडथळ्यांवर मात करीत जिद्दी द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची झेप उंचावतच ठेवली आहे. गोड चवीच्या रसाळ आणि करकरीत द्राक्षांनी केवळ गुणवत्तेच्या जोरावर जागतिक बाजारात स्थान निर्माण केले असून, दर वर्षी भारतातील, विशेषत: नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना मागणी वाढतीच आहे. मात्र यांदा उत्पादनातही घट अन् त्यात द्राक्षाला समाधानकारक भाव नसल्यामुळे शेतकरी वर्गाच्या चिंतेमध्ये भर पडली आहे, असे मत वनसगाव, द्राक्ष उत्पादक शेतकरी सुनिल शिंदे यांनी व्यक्त केले.