अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन दूतावासाजवळ स्फोटाने खळबळ

काबुल : अफगणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मंगळवारी मोठा स्फोट झाला. ही घटना अमेरिकन दूतावासाजवळ घडल्याची माहिती स्थानिक अधिका-यांनी दिली. काबूल बँकेच्या शाखेजवळ हा स्फोट झाला. ही बँक अमेरकिन दूतावासापासून फारशी लांब नाही. पण असे असले तरीही अद्याप कोणतीही जिवीत हानी झाल्याचे वृत्त नाही, असे अंतर्गत कामकाज मंत्रालयाचे प्रवक्ते नजीब डॅनिश यांनी सांगितले.