fbpx

माझ्या कुवतीपेक्षा जास्त मिळाले आता पंतप्रधानपदाचा लोभ अजिबात नाही – गडकरी

nitin-gadkari

टीम महाराष्ट्र देशा : भाजपमध्ये मला इतक्या वर्षांत जे मिळाले, ते माझ्या कुवतीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मला आता पंतप्रधानपदाचा अजिबात लोभ नाही, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

मला जे वाटते ते मी परखडपणे बोलतो. मात्र, माझ्या विधानाचा विपर्यास केला जातो. आश्वासने पूर्ण न करणार्या नेत्यांना जनता बदडेल, असे आपण म्हटले होते. ते सर्वपक्षीय नेत्यांना उद्देशून होते. त्याचा गैरअर्थ काढण्यात आला. यापूर्वीच्या माझ्या इतर विधानांतून ही चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात गडकरी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शेजारीशेजारी बसले होते. अधूनमधून गप्पाही सुरू होत्या. त्यामुळे अनेकांच्या भुुवया उंचावल्या. त्याचा उल्लेख करून गडकरी म्हणाले की, प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याची जी बैठक व्यवस्था असते, त्यानुसार माझ्या शेजारी काँग्रेस अध्यक्ष बसतात. पूर्वी सोनिया गांधी बसत. आता राहुल गांधी बसतात.