‘चौकीदार चोर है’ या विधानाचे स्पष्टीकरण द्या राहुल गांधींना न्यायालयाचे आदेश

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली. ‘चौकीदार चोर है’ ही मोहीम काँग्रेसतर्फे चालवण्यात येत आहे. ‘चौकीदार चोर है’ या विधानाचे स्पष्टीकरण राहुल गांधी यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाने मागितले आहे.

राफेल विमान खरेदी प्रकरणात अंबानींच्या कंपनीसोबत करार करण्यात पंतप्रधानांचा पुढाकार होता. हे सर्व करार नियमबाह्य आणि हेतुपूर्वक पद्धतीने केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ‘चौकीदार ही चोर है’ असे वक्तव्य केले होते. तेव्हापासून ‘चौकीदार ही चोर है’ अशी मोहीम कॉंग्रेसने सोशल मिडियावर चालवली होती.

दरम्यान, भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी यासंधर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.