सभासदांना मुदत संपलेल्या साखरेचे वाटप म्हणजे सभासदांचा विश्वासघात:नारायण पाटील

विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचा दिग्विजय बागल यांचा दावा

जेऊर :आदिनाथच्या सभासदांना दिवाळीसाठी मुदत संपलेल्या साखरेचे वाटप करण्यात आल्याची घटना करमाळा तालुक्यात घडली होती यावरून आता पाटील आणि बागल गट आमने सामने आले असून आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत.वाटप करण्यात आलेली साखर दीड वर्षापूर्वीची असून ती साखर खाण्यायोग्यचं असल्याचा दावा बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी केला आहे तर दुसऱ्या बाजूला झालेला प्रकार हा सभासदांचा विश्वासघात असल्याची टीका आमदार नारायण पाटील यांनी केली आहे

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याने दिवाळी साठी सभासदांना वाटप केलेल्या पोत्यातील साखर तांबडा तसेच काळ्या रंगाची आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती.साखरेच्या पोत्यावर २००५-२००६ अशी साखर बनविलेले वर्ष आढळून आल्याने गोंधळ निर्माण झाला होता .आमदार नारायण पाटील यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला त्याच बरोबर ज्या सभासदांच्या शेअर्स वर कारखाना उभा आहे त्यांच्या जीवाशी चालवलेला हा खेळ जनता पाहत आहे. याआधी देखील अशाच पद्धतीने 2 वर्षांपूर्वी मुदत संपलेली साखर वाटप करण्यात आली होती मात्र आता सजग सभासद आणि माध्यमांमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.मनमानी कारभार करणाऱ्या मंडळींचा हिशोब जनता मतपेटीतून चुकता करेल अशी बोचरी टीका केली आहे.

aadinath sugar factory

वाटप करण्यात आलेली साखर हि २०१५-१६ वर्षीची असून ती २००५-०६ च्या पोत्यांमध्ये चुकून भरली गेली आहे.एफ डी आय च्या अधिकाऱ्यांनी देखील याची तपासणी केली आहे तसेच २००५-०६ सालची साखर त्याचवर्षी संपली असल्याचं कागदोपत्री सिद्ध झालं आहे .जनतेला जे योग्य वाटेल त्याच उत्तर जनतेने मतपेटी मधून निश्चित द्यावं . शासनाच्या गलथान कारभारामुळे ती साखर दीड वर्ष गोडाऊनमध्ये राहिली त्यामुळे साखरेचा रंग थोडा बदलला त्यामुळे विरोधकांच्या आरोपात कोणतही तथ्य नसल्याचा दावा दिग्विजय बागल यांनी केला आहे.

You might also like
Comments
Loading...