तज्ज्ञ डॉक्टरचा मुंबईत कोरोनाने मृत्यू, तब्बल 10 तास नाही मिळाला बेड

corona

मुंबई : मुंबईतील जीएसएमसीचे शल्यचिकित्सक आणि तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा करोनाने मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण वैदकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी सुजाता आणि मुलगी श्रद्धा असा परिवार आहे.

डॉक्टर भावे हे कान-नाक-घसा तज्ज्ञ होते. मटाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी रहेजा हॉस्पिटलमध्ये एका अत्यावस्थ असलेल्या कोरोना रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया केली होती. पण नंतर त्यांनाच कोरोनाची लागण झाली.

विशेष म्हणजे ते स्वत:च गाडी चावत रहेजामध्ये उपचारासाठी दाखल झाले. पण कोरोनाच्या महामारीत सगळ्यांसाठी झटणाऱ्या या डॉक्टरांना बेड मिळण्यासाठी तब्बल 10 तास वाट पाहावी लागली.

दरम्यान नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारीत काही प्रमाणात तथ्य असल्याचा स्वीकार करून मुख्यमंत्र्यांनी यात करण्यात आलेल्या भरीव वाढीची माहिती दिली होती. राज्यात सुरुवातीला ३ हॉस्पीटलमध्ये विलगीकरणाची सुविधा होती आता २५७६ रुग्णालयात ती उपलब्ध आहे. अडीचलाख आयसोलेशनची सुविधा आणि २५००० बेडस ऑक्सीजनच्या सुविधेसह उपलब्ध आहेत. आयसीयू बेडसची संख्या २५० हून ८५०० इतकी वाढवली असल्याची माहिती दिली होती मात्र आता कोरोनामुळे मुंबईत किती भीषण अवस्था आहे, हे भावे यांच्या मृत्यूनंतर समोर आलं आहे.

अमोल कोल्हेंना चुकीच्या पद्धतीने बदनाम कराल तर…मिटकरींचा इशारा

‘लॉकडाऊन’मुळे पुण्यात पार पडलं अनोखं लग्न; पुणे पोलिसांनी केलं कन्यादान

डॉक्टरांच्या कार्यतत्परतेमुळे जन्मलेल्या बळावर वेळेत उपचार, बाईकवरचं आणले रुग्णालयात