भारतीयांची खिल्ली उडवणार ट्विट पडलं महागात ; आयपीएल मधून हकालपट्टी होण्याची शक्यता

मॉर्गन

मुंबई : कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर)चा कर्णधार इयोन मॉर्गन आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्यावर कोलकाता फ्रेंचाइजी त्यांच्यावर कारवाई करू शकते. मॉर्गन आणि मॅक्युलम यांच्यावर भारतीय भाषेची खिल्ली उडविण्याचा आरोप आहे. खरं तर, 2018 मध्ये सोशल मीडियावर झालेल्या चॅट दरम्यान मॉर्गन आणि इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर यांनी भारतीय चाहत्यांची थट्टा करण्यासाठी ‘सर’ चा वापर केला.

नंतर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमही या गप्पांमध्ये सामील झाला. यात सहभागी असलेल्यांपैकी काहींनी हे पोस्ट हटवले आहे, परंतु त्यांच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट आधीच समोर आले आहेत.

या विषयावर केकेआरने हे स्पष्ट केले आहे की, ते वर्णद्वेषासारखे टीका सहन करणार नाहीत. केकेआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांनी क्रिकबझ यांना सांगितले की, ‘सध्या या प्रकरणात कारवाई करण्यासाठी आपल्याकडे जास्त माहिती नाही. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी आम्हाला संपूर्ण प्रकरण जाणून घ्यायचे आहे. आम्ही हे स्पष्ट केले की अशा कोणत्याही टिप्पणी खपवून घेतले जाणार नाही. आमच्याकडे ‘झिरो टॉलरन्स’ चे धोरण आहे.

इयोन मॉर्गन आणि जोस बटलर यांच्या अशा पोस्ट समोर आल्यापासून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या संदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. जोस बटलर आणि इयन मॉर्गन यांचे कोणतेही विधान आले नाही.

दुसरीकडे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) ओली रॉबिन्सननंतर मॉर्गन आणि बटलरच्या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. ईसीबीने म्हटले होते की, ‘आम्ही गेल्या आठवड्यापासून या प्रकरणाचा तपास करत आहोत. वादग्रस्त शेरेबाजी करणाऱ्या सर्व खेळाडूंचा शोध घेण्यात येत आहे. आमच्याकडे या गोष्टींसाठी स्थान नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

महत्वाच्या बातम्या 

IMP