व्यायामाला जाणे पडले महागात! हेडफोन घालून रस्त्यात चालणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले

औरंगाबाद: कानात हेड्फोनेस घालुन गाणे ऐकत व्यायामासाठी जाणे ठरले जीव घेणे. एक तरुण कानात हेड्फोनेस घालून गाणे ऐकत व्यायामासाठी चालला असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना तुर्काबाद खराडी-अंबेलोहळ रस्त्यावर (ता.गंगापूर) येथे मंगळवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली.

धनंजय बाबुराव चव्हाण (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. याविषयी अधिक माहीती अशी की, तुर्काबाद येथुन रोज सकाळी व सायंकाळी अनेक नागरिक व्यायाम करण्यासाठी लासूर स्टेशनच्या अंबेलोहळ रसत्यावरुनच जा-ये करतात. रोजच्या प्रमाणे मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मित्राला फोन करून धनजंय व्यायाम करण्यासाठी पुढे गेला असता कासोडा फाट्यावर लिंबेजळगाव कडुन लासूर स्टेशनकडे जाणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने धनजंयला धडक दील्याने तो जागीच ठार झाला.

पाठीमागून दहा मिनटांनी त्याचा मित्र तिथे आला व त्याला तातडीने उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी तपासुन मयत घोषित केले. याप्रकरणी वाळुज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असुन पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शन शाखाली अधीक तपास पोलीस करीत आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP