पंतप्रधानांचे प्रदेशागमन, 55 महिन्यांत 92 देशांच्या दौऱ्यावर खर्च झाले 2021 कोटी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये शपथ घेतल्यानंतर मागील साडेचार वर्षात जगभरातील 92 देशांचे दौरे केले आहेत. 92 देशांच्या दौऱ्यासाठी आजवर सरकारकडून तब्बल 2021 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे मोदी हे विदेश दौऱ्यासाठी सर्वाधिक खर्च करणारे पंतप्रधान बनले आहेत.

पंतप्रधान मोदींच्या 55 महिन्यांमधील विदेश दौऱ्यावर 2021 कोटी रुपये खर्च झाले आहेत. मोदी यांनी जून 2014 मध्ये पहिला विदेश दौरा केला होता. 2018 चा विचार केल्यास नरेंद्र मोदीं यांचे एकूण 14 विदेश दौरे झाले आहेत. पंतप्रधानांच्या आजवरच्या 92 दौऱ्यांच्या खर्चाची सरासरी काढल्यास एका दौऱ्यासाठी जवळपास 22 कोटी रुपये खर्च आला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून केले जाणाऱ्या विदेश दौऱ्यामुळे विरोधक त्यांच्यावर कायम टीका करतात. पंतप्रधान देशात कमी आणि विदेशात जास्त राहत असल्याची टीका केली जाते. मात्र मोदी यांनी केलेल्या दौऱ्यामध्ये अनेक देशांशी व्यवसायिक आणि इतर करार देखील करण्यात आले आहेत, हे विसरून चालणार नाही.