‘जे काँग्रेस नेते भाजपला घाबरतात त्यांना पक्षातून हाकलून द्या’, राहुल गांधींची सडेतोड भूमिका

राहुल गांधी

नवी दिल्ली : आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचे लोक नको आहेत. आरएसएसचे हितचिंतक आणि त्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी काँग्रेसपासून दूर राहावे. निर्भय लोकांसाठी काँग्रेसची दारे उघडी असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांनी आज काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवकांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्यांवर टीका केली. ‘ज्यांना भीती वाटते त्यांनी काँग्रेसमधून खुशाल जावं. ज्यांना कशाचीच भीती वाटत नाही असे लोक काँग्रेसमध्ये आहेत. त्यांचं स्वागत आहे. काँग्रेस सोडून गेलेले सर्व लोक संघाशी संबंधित होते’, अशी टीका राहुल यांनी केली.

राहुल गांधी यांनी यावेळी कार्यकर्त्यांना फेक न्यूजमुळे घाबरून न जाण्याचे आवाहन केलं. भाजपकडून येणाऱ्या फेक न्यूजमुळे घाबरून जाऊ नका. फेक न्यूजवर विश्वास ठेवणं आता लोकांनी बंद केले आहे. त्यामुळेच आता भाजपच्या फेक न्यूजबाबत घाबरण्याचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी सरकारच्या ध्येयधोरणांवर कठोर टीका करताना दिसून येतात. ते आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत असतात. मोदी सरकारच्या चुका आणि जे व्हायला हवं, त्याविषयी ते सातत्याने मते मांडत असतात.

महत्वाच्या बातम्या