आगामी मंत्रिमंडळात ‘हे’ असतील संभाव्य मंत्री

टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी नव्या सरकारच्या स्थापनेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. शिवसेनेनं अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. तर, भाजपनं मुख्यमंत्रीच काय, महत्त्वाची खातीही देण्यास नकार दिल्यानं गाडं अडलं आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये केवळ कलगीतुरा रंगला आहे.

भाजप वर्चस्ववादाचं राजकारण करत असल्यानं शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. कोणीही मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानं हा पेच अधिकच वाढला आहे.

Loading...

दरम्यान, मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबद्दलच्या चर्चांना उधाण आले असून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. आगामी सरकारमध्ये काही नवे चेहरे देखील पहायला मिळतील अशी शक्यता आहे. पंकजा मुंडे, राम शिंदे, डॉ.अनिल बोंडे हे तीन कॅबिनेट मंत्री पराभूत झाले आणि विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारीच मिळाली नाही. त्यामुळे भाजपच्या कोट्यातील ग्रामविकास, महिला व बालकल्याण, कृषी, जलसंधारण, ऊर्जा व उत्पादन शुल्क अशी महत्त्वाची खाती अन्य मंत्र्यांना दिली जाऊ शकतात.मंत्रिमंडळाची संभाव्य यादी पुढीलप्रमाणे….

भाजपकडून यांना मिळणार संधी

देवेंद्र फडणवीस,आशिष शेलार,चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवार,संजय कुटे,रणजीत पाटील,परिणय फुके,राहुल कुल,शिवेंद्र राजे भोसले,सुरेश खाडे,पंकजा मुंडे,राम शिंदे,गणेश नाईक,गिरिश महाजन,राधाकृष्ण विखे पाटील,बबनराव लोणीकर,सुभाष देशमुख,महादेव जानकर,सदाभाऊ खोत,संभाजी पाटील निलंगेकर,जयकुमार रावळ,महेश लांडगे

शिवसेनेकडून यांना मिळणार संधी

एकनाथ शिंदे,आदित्य ठाकरे,दिवाकर रावते,रामदास कदम,गुलाबराव पाटील,तानाजी सावंत,दीपक केसरकर,रविंद्र वायकर,सेनेच्या कोट्यातून आ.बच्चू कडू यांना देखील संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी