fbpx

बीसीसीआय घेणार ‘या’ देशाच्या क्रिकेट मंडळाला दत्तक

टीम महाराष्ट्र देशा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी मालदीवच्या दौऱ्यावर आहेत. दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. मालदीवचे क्रीडा मंत्री अहमद महलूफ यांनी भारतीय क्रिकेट मंडळाला (बीसीसीआय) मालदीव क्रिकेटला दत्तक घेण्याची विनंती केली आहे.

महलूफ म्हणाले की, ज्या पद्धतीने बीसीसीआयने अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाला दत्तक घेतले होते. त्याचपद्धतीने बीसीसीआय क्रिकेटच्या क्षेत्रात आमचीही मदत करेल अशी अपेक्षा आहे. क्रीडा आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही एकाच रणनीतीवर काम करु.

ते म्हणाले, क्रीडा क्षेत्रात आम्हाला भारताची मोठी मदत मिळाली आहे. बीसीसीआयबरोबर आमची बैठक यशस्वी ठरली आहे. क्रिकेटला विकसित करण्यात आम्हाला त्यांची मदत मिळेल. भारताचा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.