देशाच्या अर्थव्यवस्थेचा होणार वेगाने विस्तार

arun jaitley

नवी दिल्ली:  येत्या फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्या आधी यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल? म्हणून उद्योजकांमध्ये चर्चा रंगली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

‘या वर्षीचा अर्थसंकल्प सर्वाना खुश करणारा नसेल’ त्यामुळे सामन्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेगाने विस्तार होत असून २५ वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे. असे अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. भारताप्रमाणे आसियानमधील देशांचा वेगाने विस्तार होत आहे.  पाश्चात्य  देशांचा विकास अपेक्षेप्रमाणे होत नसताना आसियानमधील राष्ट्रांचा विकास चांगला होत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर काही प्रमाणात मंदी असून आसियान देशांचा विकास ४.५ ते ५ टक्क्यांनी वाढत आहे. असेही ते म्हणाले.