हिवाळी अधिवेशनापूर्वी होणार राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार – चंद्रकांत पाटील

औरंगाबाद: हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात चंद्रकांत पाटील हे दुस-या क्रमांकाचे मंत्री असल्याने तसेच पक्षाच्या दिल्‍लीतील हायकमांडमध्ये त्यांचे वजन चांगले असल्याने त्यांनी दिलेल्या या माहितीला विशेष महत्त्व आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विस्ताराबाबतचा सविस्तर अहवाल घेवून दिल्लीला जाणार आहेत. दिल्‍लीतून मान्यता मिळाल्यानंतर त्यावर कार्यवाही होईल. मराठवाड्यात प्रतिवर्षी एक मंत्रीमंडळ बैठक घेण्याबाबत विचारले असता ते महणाले की, नेहमी प्रमाणे मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल

You might also like
Comments
Loading...