प्लास्टिक बंदीसाठी व्यापाऱ्यांना हवी आहे 2019 पर्यंत मुदतवाढ !

टिम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्यात 23 जून पासून प्लास्टिक बंदी लागू झाली आहे.त्यामुळे व्यापारी वर्गात असंतोषाची लाट पसरली आहे.तसेच प्लास्टिक बंदीला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शिवला आहे. 2019 पर्यंत व्यापाऱ्यांना वेळ देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

सध्या प्लास्टिक बंदीबाबत सर्व सामन्यामध्ये संभ्रम आहे, शिवाय प्लास्टिक बंदी ने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे, असे देखील व्यापाऱ्यांचे मत आहे. सरकारकडून प्लास्टिक बंदी वरची मुदत वाढून घेण्यासाठी व्यापाऱ्यांचा एक गट भाजपचे आमदार राज पुरोहित यांच्याशी गुरुवारी भेट घेतली. हि बैठक नवी मुंबई, ठाणे येथे पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी आपली कैफियत पुरोहित यांच्याकडे मांडली. परंतु सरकारकडून प्लास्टिकबंदीची पूर्ण तयारी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.