Exit Polls : पुन्हा महायुतीचेचं सरकार येणार, तर महाआघाडी विरोधी बाकावरचं ?

maharashtra vidhansabha

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. राज्यभरात आज एका टप्यात मतदान पार पाडले. काही ठिकाणी पावसाचे सावटअसल्याने मतदानाचा टक्का काहीसा घसरताना दिसला. तर शहरी भागा पेक्षा ग्रामीण भागात मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. येत्या २४ तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारराजाने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे. हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

तत्पूर्वी काही एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिवेसेना बहुमत मिळत असल्याच सांगण्यात येत आहे. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. एबीपी माझा आणि सी ओटर्सच्या अंदाजानुसार महायुतीला 200 पेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर महाआघाडीला 70 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर त्या खालोखाल शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असणार आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला ही निवडणूकही फारशी अनुकूल ठरली नसल्याचं दिसत आहे.

तर NEWS18 लोकमतच्या एक्झिट पोलनुसार भाजपला – 144, शिवसेनेला – 99 , राष्ट्रवादी कॉंग्रेस – 22 , कॉंग्रेस – 17 एवढ्या जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महायुतीला तब्बल 243 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर महाआघाडीचा सुपडासाफ झाल्याचा अंदाज news18 लोकमतने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या