fbpx

‘१९९९ पासून जाहीर झालेले एक्झिट पोल्स चुकीचे ठरत गेले आहेत’

naydu

टीम महाराष्ट्र देशा- १७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, यावर रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध मतदानोत्तर एक्झिट पोलमध्ये अंदाजांमध्ये एकवाक्यता दिसून आली. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. मात्र त्याआधी विविध चॅनेल आणि दैनिकांनी सर्व्हेच्या माध्यमातून जनतेचा जाणून घेतलेला लोकसभेचा मूड यावरुन निवडणूक निकालांचे अंदाज बांधण्यात येत आहेत.

दरम्यान, १९९९ पासून एक्झिट पोल्सनी वर्तवलेले भाकीत चुकीचे ठरतं आहे. यामुळे एक्झिट पोल्सने दिलेल्या कलाला निकाल म्हणून पाहता येणार नाही. खरे निकाल वेगळे असू शकतात अशी भीती भाजपचे माजी नेते आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे एका अनौपचारिक बैठकीला नायडू यांनी रविवारी संबोधित केले. यावेळी एक्झिट पोलचे निकाल जाहीर होताच सर्वांनी  नायडूंचे अभिनंदन करत भाजप सत्तेत येईल अशी आशा व्यक्त केली.

नेमकं काय म्हणाले नायडू ?

‘१९९९ पासून जाहीर झालेले एक्झिट चुकीचे ठरत गेले आहेत. २३ मे ला जाहीर होणारे निकाल याहून वेगळे असू शकतात’.प्रत्येकच पक्षाला आपणच जिंकू अशी आशा वाटत असते. त्यामुळे निकालाच्या दिवशी प्रत्येक पक्ष आपणच जिंकू असा आत्मविश्वासही व्यक्त करत असतो. पण या विश्वासाला काहीच आधार नसतो. त्यामुळे खरा निकाल एक्झिट पोल्सप्रमाणेच लागेल असं मानणं चुकीचं आहे’.