fbpx

‘एक्झिट पोल बनावट, कार्यकर्त्यांनो निराश होऊ नका’

EVM

टीम महाराष्ट्र देशा- एक्झिट पोलमध्ये मागे पडल्यापासून लोकसभा निवडणुकीसाठी आशादायी असलेले विरोधी पक्ष आता इव्हीएम तसेच एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थितीत करत आहेत. जाहीर झालेले एक्झिट पोलचे अंदाज बनावट आहेत. अपप्रचारामुळे निराश होऊ नका, असा संदेश काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. त्याचवेळी त्यांनी पुढचे २४ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे, असेही म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर गेल्या रविवारी वेगवेगळे एक्झिट पोल जाहीर झाले. या सगळ्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच सत्तेच्या जवळ जाईल, असे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करून कार्यकर्त्यांना एक्झिट पोल अपप्रचार करणारे असून ते बनावट आहेत. त्याकडे लक्ष देऊ नका, असे म्हटले आहे.