fbpx

एक्झीट पोल : राहुल-प्रियांकाला जनतेने नाकारले, मोदींची जादू कायम

टीम महाराष्ट्र देशा- १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान पार पडले आहे. त्यामुळे आता साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले आहे. तसेच आता एक्झीट पोलनुसार लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ ला बहुमत मिळण्याची शक्यता आहे.

या एक्झीट पोल्सचा जर बारकाईने निरीक्षण केले तर राहुल-प्रियांका ही जोडी सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकीदरम्यान राफेल करार, जीएसटी आणि नोटाबंदी या मुद्द्यांवरून मोदींवर प्रचंड टीका केला. जीएसटी म्हणजे गब्बर सिंह टॅक्स तर नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली अशीही टीका त्यांनी केली. पण या टीकेनंतर देखील ते जनतेमध्ये काँग्रेसविषयी जनतेत भरोसा निर्माण करू शकले नाही.

एवढंच नव्हे तर काँग्रेसने प्रियंका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणून एक मोठी खेळी केली. पण प्रियंका यांचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. असं एक्झिट पोलमध्ये दिसतं आहे.