एग्झिट पोल : राजस्थानमध्ये कॉंग्रेस सरकार स्थापन करणार !

bjp and congress

टीम महाराष्ट्र देशा : पाच राज्यांमधील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध होऊ लागले आहे. दरम्यान, सर्वांचे लक्ष लागलेल्या राजस्थानमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. टाइम्स नाउ-सीएनएक्सच्या अंदाजानुसार राजस्थानात काँग्रेसला १०५ जागा तर भाजपला ८५ जागा मिळतील. राजस्थानात काँग्रेस सरकार स्थापणार असल्याचा अंदाज आहे.

राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांचानिकाल 11 डिसेंबरला लागणार आहे. राजस्थान आणि तेलंगणामध्ये झालेल्या मतदानालानागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. मतदानाची वाढलेली टक्केवारी ही सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटी मानली जाते. त्यामुळे तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस)आणि राजस्थानमधील सत्ताधारी भाजप सरकारची धाकधुक वाढली आहे.

राष्ट्रवादीची २४ जागांची मागणी कॉंग्रेसला अमान्य,आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता