fbpx

एग्झिट पोल : शिवराजसिंह ‘रेड झोन’ मध्ये ; कॉंग्रेसच्या आशा पल्लवित

टीम महाराष्ट्र देशा : राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांचा निकाल 11 डिसेंबरला लागणार आहे. राजस्थान आणि तेलंगणामध्ये झालेल्या मतदानालानागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. मतदानाची वाढलेली टक्केवारी ही सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटी मानली जाते. त्यामुळे तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस)आणि राजस्थानमधील सत्ताधारी भाजप सरकारची धाकधुक वाढली आहे.

मतदान यंत्रांमध्ये मतदारांनी आपला कौल आता बंदिस्त केलाय. तो नेमका काय हे ११ डिसेंबरला स्पष्ट होईलच. पण त्याबद्दलचा अंदाज EXIT POLL मधून बांधला जात असतो. मध्यप्रदेशात सत्तांतर होण्यासाठी अंदाजे १ हजार कोटींचा सट्टा लागलाय. तर राज्यात भाजपा-काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होईल, यावर ५०० कोटींचा सट्टा लागलाय. शिवराजसिंग चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री होतात की कमलनाथ किंवा ज्योतिरादित्य शिंदे यांची वर्णी लागते, यावरही जोरदार सट्टा लागलाय.

LIVE UPDATES :

टाइम्स नाऊ – मध्य प्रदेश
भाजप – 126
काँग्रेस – 89
बसपा – 06
इतर – 09
एकूण – 231

टाईम्स नाऊ – छत्तीसगड
काँग्रेस – 35
भाजप – 46
बसपा – 7
अन्य – 2

टाइम्स नाऊचा एक्झिट पोल – राजस्थान
भाजप – 85
काँग्रेस – 105
बीएसपी-जेसीसीजे – 02
इतर – 07
एकूण – 199

1 Comment

Click here to post a comment