fbpx

एक्झिट पोल; कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षचं पराभवाच्या छायेत

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान आज पार पडले. त्यामुळे आता साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले आहे. तसेच आता एक्झीट पोलनुसार लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेत असणाऱ्या पक्षांच्या संभाव्य विजयी उमेदवारांची आकडेवारी बाहेर येऊ लागली आहे.

प्रसार माध्यमांच्या एक्झिट पोलनुसार नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेडमधून विजय मिळवणं कठीण जात असून, भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसने केवळ दोन जागांवर विजय मिळवला होता. त्यामध्ये नांदेड मधून अशोक चव्हाण तर हिंगोली मतदार संघातून राजीव सताव यांचा समावेश आहे. २०१४ च्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजप कडून बी.डी. पाटील यांनी उमेदवारी लढली होती.

यंदाच्या निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे यंदाची निवडणूक अशोक चव्हाण यांना अडचणीची गेली असून, एक्झिट पोल नुसार नांदेड लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा झेंडा फडकणार असल्याचे दिसून येत आहे.