आता एक्झीट पोल देखील केले ‘मॅनेज’ अल्पेश ठाकोरचा आरोप

गुजरात मध्ये कॉंग्रेसला बहुमत अल्पेश ठाकोरचा दावा

टीम महाराष्ट्र देशा: गुजरातमध्ये सर्वच एक्झीट पोलमध्ये भाजपला सत्ता मिळताना दिसत आहे पण गुजरातमध्ये सध्या भाजपविरोधी वातावरण आहे.त्यामुळे काँग्रेस 104 ते 106 जागा जिंकेल असा दावा ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर यांनी केला आहे. त्याचबरोबर . एक्झीट पोल भाजपला इतक्या जागा देतातच कशा असा प्रश्न देखील ठाकोरने केला आहे. तसंच हे एक्झीट पोल मुंबईतील सट्टेबाजांनी मॅनेज केले असल्याची माहितीही आपल्याला मिळाली आहे असंही अल्पेश ठाकोरने म्हटल आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गुजरातच्या निवडणुकांचा निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे. या निकालाकडे आत सगळ्या देशाचं लक्ष आहे.