‘आघाडीच्या रुळावर धावणारं मनसेचं इंजिन एक्झिट पोलमध्ये फेल’

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीत महायुती विरोधात सभा घेणाऱ्या राज ठाकरेंचा लोकसभा निवडणूक निकालाच्या एक्झिट पोल नुसार झिरो इफेक्ट झाल्याचे दिसून येत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ६ तर एक्झिट पोल नुसार यंदाच्या निवडणुकीत १३ जागांवर आघाडी विजय मिळवणार असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे २०१४ पेक्षा आघाडीला केवळ ७ जागा जास्त मिळणार असल्याचे दिसत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार निवडणूक लढला नाही. मात्र तरीही राज ठाकरे यांनी महायुतीविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी सभा घेतल्या. इतकेच नव्हे तर, लाव रे तो व्हीडोयो म्हणत त्यांनी भाजपची पोलखोल केली. राज ठाकरे यांच्या सभेचा कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला फायदा होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, माद्यामांच्या एक्झिट पोल नुसार राज ठाकरे यांच्या सभांचा झिरो इफेक्ट झाल्याचे दिसून येत आहे.

माध्यमांच्या एक्झिट पोल नुसार

शिवसेना – १५ – १७

भाजपा – १७ – २०

Loading...

कॉंग्रेस – ३ – ५

राष्ट्रवादी – ७ – ९

Loading...

वंचित बहुजन आघाडी – ००

Loading...

इतर – १

२०१४ लोकसभा निकाल

शिवसेना – १९

भाजप – २३

कॉंग्रेस – २

राष्ट्रवादी – ४

इतर – ००