fbpx

एक्झिट पोल चुकीचे, अंतिम चित्र २३ मे ला स्पष्ट होईल : शशी थरूर

टीम महाराष्ट्र देशा : १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान पार पडले आहे. त्यामुळे आता साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले आहे. तसेच आता एक्झीट पोलनुसार लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ ला बहुमत मिळण्याची शक्यता आहे.

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते शशी थरूर यांनी ट्वीट करत एक्झिट पोल चुकीचे असल्याचं म्हटले आहे. थरूर यांनी ‘माझ्या मते एक्झिट पोल हे चुकीचे आहेत. मागील आठवड्यात ऑस्ट्रेलियामध्ये ५६ एक्झिट पोल चुकीचे ठरले होते’ भारताचं म्हणाल तर, इथे जनता मोठ्या प्रमाणावर सत्य सांगण्यापासून दूर राहते म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली. एक्झिट पोलचे सर्व अंदाज धुडकावून लावत थरुर यांनी आपण निवडणुकांच्या अंतिम आणि तितक्याच खऱ्या निकालांची वाट पाहू, असं ट्वीट केले आहे.

दरम्यान, प्रसारमाध्यमांनी केलेल्या सर्वेनुसार ‘एनडीए’ बहुमताच्या जवळ पोहोचेल असा अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार केंद्रात सत्ता स्थापन करेल अशी शक्यता आहे.