एक्झिट पोल म्हणजे पुढील दोन दिवसांचे मनोरंजन – सिद्धरामय्या

टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक मतदानानंतर देशभरातील न्यूज चॅनेल आणि संस्थांकडून एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत, बहुतांश पोलनुसार भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, एक्झिट पोल म्हणजे पुढील दोन दिवसांचे मनोरंजन त्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष देवू नये, निश्चिंत रहा आणि सुट्टीचा आनंद घ्या म्हणत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कॉंग्रेसच पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

कर्नाटक निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची तर कॉंग्रेससाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे, मतदानानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आपणच विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार तूर्तास तरी कर्नाटकचा कौल भाजपच्या बाजूने झुकल्याच दिसत आहे, यामध्ये भाजपला १०७ कॉंग्रेस ८८ जेडीएस २५ जागांवर विजयी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान भाजपला जरी जास्त जागा दिसत असल्या तरी सत्तास्थापन करण्यासाठी कॉंग्रेस किंव्हा भाजपला जेडीएसचा पाठींबा घ्यावा लागणार हे नक्की आहे,

bagdure

एबीपी न्यूज आणि सी व्होटरचा एक्झिट पोल

काँग्रेस – 88
भाजप – 107
जेडीएस – 25

आज तक
काँग्रेस – 112
भाजप – 85
जेडीएस – 26

टाइम्स नाऊ
काँग्रेस – 96
भाजप – 86
जेडीएस – 35

न्यूज एक्स
काँग्रेस – 75
भाजप – 106
जेडीएस – 37

रिपब्लिक टीव्ही
काँग्रेस – 77
भाजप – 104
जेडीएस – 37

You might also like
Comments
Loading...