विद्यमान सरकारने कोकणच्या तोंडाला पाने पुसली – सुनील तटकरे

suinl tatkare

टीम महाराष्ट्र देशा- सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याची चांगली संधी आहे. सरकारच्या फसव्या योजना जिल्ह्यातील जनतेसमोर पोहोचवण्यासाठी जनप्रबोधन केले पाहिजे. त्याची सुरुवात महामार्ग दुरुस्तीसाठी आंदोलन करून स्थानिकांनी करावी, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित पक्ष बांधणी मेळाव्यात बोलताना केले.

तटकरे यांनी केंद्रातील परिवर्तनाला साडेतीन तर राज्यातील परिवर्तनाला तीन वर्षे झाली. काय विकास झाला? काय बदल घडले? जनधन खात्यात दीड रुपये तरी जमा झाले काय? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अर्थसंकल्प आघाडी सरकारने नऊ कोटीवरुन ९० कोटींवर नेला होता. आज तो अर्थसंकल्प वाढविण्याची क्षमता पालकमंत्र्यांमध्ये आहे का? पालकमंत्री केसरकर यांच्याजवळ विकास करण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही, असे सांगत देशात सर्वात स्वच्छ जिल्हा पुरस्कार मिळवलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरी येथील गवत देखील ते कापून घेऊ शकत नाहीत. यावरून त्यांच्या कामाचा अंदाज येत असल्याचा टोमणा तटकरे यांनी मारला.

Loading...

महामार्गाचा एक रुपयांचा टोल भरणार नाही केंद्रात आघाडी सरकार असताना मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण केंद्र सरकारच्या निधीतून होईल, असे ठरले होते. मात्र, केंद्राच्या अवजड उद्योग मंत्र्यांनी रायगड येथे कामाचा शुभारंभ करताना चौपदरीकरण नंतर टोल घेण्यात येणार असे सांगितले. यावर बोलताना तटकरे यांनी आम्ही एक रुपयाही टोल भरणार नाही. सर्व खर्च केंद्राच्या निधीतून करावा, असा इशारा दिला. कोकणात ओला दुष्काळ जाहीर करावा कोकणात भात हे महत्वाचे पीक आहे. यावर्षी हे पीक कापण्यापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कोकणात ओला दुष्काळ जाहीर करावा, असे सरकारला सूचित करत असल्याचे यावेळी तटकरे यांनी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले