जालना ; शासकीय समित्यांचे अस्तित्व संपुष्टात

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील शिवसेना, भाजप महायुतीचे सरकार बदलले त्याचबरोबर राज्यात नव्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यासोबतच जिल्हास्तराबरोबर तालुकास्तरीय शासकीय समित्याचे आपोआप अस्तित्व संपल्याचे चित्र दिसत आहे.

मागील पाच वर्षांपूर्वी राज्यात महायुतीचे शासन अस्तित्वात आले त्यांच्या चार वर्षांचा दीर्घ कालावधी गेल्यानंतर जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या शिफारसीनुसार जिल्हा व तालुकास्तरावर विविध शासकीय खात्यांत विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासकीय समित्या घोषित करण्यात आल्या. त्यानुसार जिल्हा व तालुकास्तरावर अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना या समित्यांवर काम करण्याची संधी मिळाली होती. अर्थात, पुन्हा महायुतीचे सरकार राज्यात आले असते तर या समित्यांवर पदाधिकाऱ्यांची फेरनियुक्ती अथवा बदल झाला असता; परंतु राज्यात निवडणुकीनंतर निर्माण झालेला सत्तापेच हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. आता राज्यात राष्ट्रपती राजवट अस्तित्वात आली आहे.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतरच विविध महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा व तालुकास्तरीय समितीच्या आपोआप अस्तित्व संपते. या समित्यांवर मागील एक ते दीड वर्षापासून जिल्ह्यात अनेकांना समित्यांवर काम करण्याची संधी मिळाली होती. यामाध्यमातून अनेक पदाधिकाऱ्यांनी जनसेवेचे काम केले तर काहींनी अनेक शासकीय योजनांच्या कामात खोडा निर्माण केल्याचीही चर्चा होती.

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा व तालुकास्तरीय समितीचे अस्तित्व आपोआप संपते. त्यातच आता राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने सर्व राज्यकारभार हा शासनाच्या अखत्यारीत आला आहे. त्यामुळे आता कोणत्याही शासकीय समित्यांचे अस्तित्व शून्य आहे. त्याचबरोबर नव्याने कोणत्याही पक्षाचे सरकार येऊन त्यांच्या पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार नव्याने समित्या गठित होत असतात. अशी माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या