fbpx

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

rashtrawadi congres

मुंबई: सरकारने कर्जमाफीची घोषणा तर केली. मात्र अद्याप शेतकऱ्यांचा हातात कर्जमाफीची रक्कम अद्याप जमा झाली नाही. सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व संध्येला आयोजित केलेल्या चहापाणाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

न्यायासाठी मंत्रालयात येऊन शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहे. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेऊन चहापाणाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णय घेतला. तसेच कमला मील आग प्रकरण, भीमा कोरेगाव घटना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, फसलेली कर्जमाफी योजना, मुंबई व राज्याच्या अन्य शहरी भागातील वाढत्या समस्या, भ्रष्टाचार, शिक्षण, बेरोजगारी या सर्व मुद्यांवर विधीमंडळ अधिवेशनात आक्रमक होऊन सरकारला जाब विचारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २६ फेब्रुवारीपासून सुरवात आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांच्या गटनेत्यांची महत्वपूर्ण बैठक विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली.या बैठकीला विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादीचे अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, शेकापचे गणपतराव देशमुख, पीआरपीचे प्रा.जोगेंद्र कवाडे, सपाचे आ. अबू आझमी आदी नेते उपस्थित होते.

2 Comments

Click here to post a comment