fbpx

एसटीला इंधन कर माफ करा! दिवाकर रावतेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Diwakar-Raote

टीम महाराष्ट्र देशा: परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सातत्याने वाढत असलेल्या डिझेलच्या किमतीच्या अनुषंगाने एसटीला डिझेलच्या वेगवेगळ्या करांमधून सवलत द्यावी, काही कर माफ पण करावे अशी मागणी केली आहे. डिझेल दर वाढीचा एसटी महामंडळास मोठा तोटा होत असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगार करारावर परिणाम होत असल्याने याचा प्रामुख्याने विचार करावा असे रावते यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिले आहे.

सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे महामंडळावर वार्षिक ४०० कोटी रुपयांचा भार पडत असल्याने याचा वेतन करारावर फरक पडत आहे, तसेच वेतन करार रखडला गेला आहे. या सर्व बाबींमुळे एसटी तोट्यात जाऊन सर्व आर्थिक गणित कोलमडून जात असल्याचे पत्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रातून कळविले आहे. यामुळे इंधन दरवाढीवरील करमाफी देण्यात यावी अशी मागणी रावते यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

1 Comment

Click here to post a comment