खळबळजनक! ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याला आग

औरंगाबाद : औरंगाबाद शहराजवळील ऐतिहासिक दौलताबाद किल्ला तसेच परिसराला आज शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली. आगीने किल्ल्याचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग व्यापला आहे. सायंकाळी साडेपाचपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. तसेच आग विजावण्यासाठी दोन बंब आणि टँकर हे आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आग का लागली याचे कारण समजू शकले नाही.

दौलताबाद किल्ल्याच्या चहुबाजूने आग लागली आहे. आग विजावाण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी परिश्रम करीत आहे. किल्ल्याच्या आत देखील आग लागली असून रस्ता नसल्यामुळे अग्निशमन विभागाचा बंब जात नसल्याने कर्मचाऱ्यांना आग विजावाण्यासाठी त्रास होत आहे. औरंगाबाद-खुलताबाद रोडलगत असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत आग विस्तारली आहे.

आगीचे लोन दूरदूरपर्यंत दिसत आहे. आगीचे रूप मोठे असल्यामुळे शेंद्रा, सिडको, पदमपुरा येथून अग्निशामक दलाचे बंब दौलताबादकडे रवाना झाले आहे. किल्ल्यात तसेच आसपासचा परिसर मोठा असल्यामुळे आग विझवायला विलंब होत असून लवकरच आग आटोक्यात येणार असल्याची माहिती फायरमन लक्ष्मण कोल्हे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला दिली.

महत्त्वाच्या बातम्या