बीड : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या, अनेकांचा भांडाफोडसाठी येत असल्याचे जाहीर करणाऱ्या, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा रविवारी परळीत दाखल झाल्या. दरम्यान, त्यांच्यावरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. आज त्यांना अंबाजोगाई कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मात्र, पत्रकार परिषद घेऊन हंगामा करण्याचा हेतू घेऊन परळीला आलेल्या करुणा शर्मा यांची एका व्यक्तीशी बोलतानाची एक कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये करुणा शर्माला समोरचा व्यक्ती पत्रकार परिषद घेऊन काही आरोप करणे म्हणजे कोर्टाचा अवमान होईल, याबाबत वकिल सुषमा सिंह यांनी जारी केलेल्या नोटीसचा उल्लेख करून सांगतोय व त्यामुळे सांभाळून बोला असा सल्ला देतोय.
तर त्यावर करुणा शर्मा म्हणतात, ‘ये तो बहुत अच्छा हुआ, इसमे तो फायदा है अपना, मै मंदिर जाऊंगी, और रायता फैला दुंगी। अपने को क्या रायता फैलाना है, अपने को पैसे निकालने है प्रेशर बनाके पैसे’ असे म्हणताना ऐकायला मिळत आहे.
मागील काही दिवसांपासून करुणा शर्मा व त्यांचे साथीदार हे सगळं केवळ ब्लॅकमेलिंग करण्यासाठीच करत आहेत हे या व्हायरल ऑडिओ क्लिप वरून स्पष्ट होत असल्याचा आरोप होत आहे. आज परळीत येण्याचा त्यांचा उद्देशही हाच होता हे देखील या ऑडिओ क्लिपवरून स्पष्ट होत असल्याचे धनंजय मुंडे समर्थकांचे म्हणणे आहे. दरम्यान, ‘महाराष्ट्र देशा’ या ऑडिओच्या सत्यतेबाबत कसलाही दावा करत नाहीये. ही एक व्हायरल ऑडिओ क्लिप आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गणेशोत्सवात मुंबई, पुण्यात नवे निर्बंध ? मुख्यमंत्री निर्णय घेणार – मंत्री वडेट्टीवार
- संजय राऊतांना अटक करा ; भाजपची मागणी तर राऊत म्हणतात…
- संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा – गोऱ्हे
- बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीला धक्का, सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले
- वाढीव रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांना अक्रियाशील घोषित करुन नये, आ. पवार यांची मागणी