खळबळ! ‘ती’ संवेदनशील माहिती फडणवीसांनी नव्हे तर मलिक व आव्हाडांनीच उघड केली; रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा

खळबळ! ‘ती’ संवेदनशील माहिती फडणवीसांनी नव्हे तर मलिक व आव्हाडांनीच उघड केली; रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा

मुंबई : फोन टॅपिंग आणि काही गोपनीय कागदपत्रे उघड केल्याच्या आरोपाखाली अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्यांना वगळून सरसकट त्यांना दिलासा देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सोमवारी राज्य सरकारने उच्च घेतली होती. मात्र, आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कारण शुक्ला यांनी आज कोर्टासमोर एक खळबळजनक दावा केला आहे.

राज्य सरकारने कोर्टात घेतलेल्या भूमिकेवर रश्मी शुक्ला यांनी उत्तर दिले आहे. संवेदनशील माहिती देवेंद्र फडणवीस नाही, तर नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये उघड केली होती असा दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेतली होती. त्यामुळे राज्यानेच अवमान केला आहे. आपल्याकडे कुठलीच कागदपत्रे नाहीत. महाराष्ट्र सरकारने काही फोन नंबरवर होणारं संभाषण टॅप करण्याची मंजुरी दिली होती. पोलीस दलातील बदल्या आणि पोस्टिंगच्या वेळी होणाऱ्या भ्रष्टाचाऱ्याच्या तक्रारी तपासण्यासाठी ही परवानगी दिली होती, असे रश्मी शुक्ला यांच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले.

रश्मी शुक्ला गुप्तवार्ता विभागाचे नेतृत्व करत होत्या. त्यावेळेस महाराष्ट्राच्या डीजीपींनी काही नंबरवर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले होते. ते नंबर राजकीय नेत्यांशी निगडीत मध्यस्थींचे होते. इच्छित स्थळी पोस्टिंग आणि बदलीसाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम मागितली जात होती, असे रश्मी शुक्ला यांचे वकील महेश जेठमलानी यांनी उच्च कोर्टाला सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या