मुंबई : उर्फी जावेद आपल्या बोल्ड स्टाईल ने प्रत्येक वेळी चर्चेत असते. उर्फिचे सोशल मिडिया अकाउंट तिच्या विचित्र प्रकारच्या फोटोंनी आणि व्हिडीओंनी भरलेलं आहे. तिच्या विचित्र ड्रेसिंगने चाहत्यांना थक्क केले आहे. या स्टाईलमुळे उर्फी नेहमी चर्चेत असते.
उर्फीचे आत्ताच इंस्टाग्रामवर तीन लाख फॉलोवर्स पूर्ण झाले आहेत. उर्फिने पुन्हा एकदा चाहत्यांना तिचा हॉट लुक दाखवला आहे. त्या फोटोनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. उर्फिने स्वतः डिझाईन केलेली बिकनी घालून समुद्रकिनारी जाऊन व्हिडीओ बनवला. तिच्या इंस्टाग्रामवरून तिने तो व्हीडीओ पोस्ट केला आहे.
व्हीडीओ शेअर करत तिने लिहले की, बिकीनी टॉप मी स्वतः बनवला आहे. तिचा हा हॉट लुक पाहून लोकांची तारांबळ उडाली आहे, त्यानंतर ती आता सारखी ट्रोलिंगची शिकार होत आहे. अनेक लोकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या. एका युजरने तर कमेंट केली की, “मी आज काहीही घातलेले नाही… अरे देवा” अशा प्रकारे अनेकांनी या व्हिडीओवर अश्लील कमेंट केल्या. पण काही लोकांना तिचा हा लुक देखील आवडला.
https://www.instagram.com/reel/CdZ_EkQoJG8/?utm_source=ig_web_button_share_sheet
उर्फिने अनेक मालिकांमध्ये काम केल आहे. तिने ‘बडे भैया की दुल्हनिया’, ‘मेरी दुर्गा’, ‘बेपनाह’ आणि ‘पंच बीट सीझन 2′ यासह अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे. अजून “ये रिश्ता क्या कहलाता है” यात देखील उर्फी काही काळ दिसली. कसौटी जिंदगी की 2’ मध्ये तनिषा चक्रवर्तीची भूमिकाही उर्फिने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :