मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आहे. मंगळवारी सकाळी अशी माहिती मिळाली की, उद्धव ठाकरे सरकारच्या १३ बंडखोर आमदारांनी गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकला असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील आहेत. याची माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. आता या पार्शवभूमीवर अभिनेत्री हेमांगी कवी हिने याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. आता या पोस्टनंतर हेमांगीने आणखी एक पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट देखील आता खूप चर्चेत आहे.
हेमांगीने तिच्या इंस्टाग्रामवरून एक स्वतःचा एक फोटो शेअर केला आली. आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “शिकारीला निघालेल्या लोकांची कधी कधी शिकार होते. नेहमीच पंजांनी नाही तर कधी कधी डोळ्यांनी होते. तेव्हा जपून…” हेमांगीच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हेमांगीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. नेटकरी या पोस्टवर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. “कसली जीवघेणी नजर तुझी, एकदम मस्त” असं एका युजरने म्हटल आहे. हेमांगीने टायगर प्रिंट स्कर्ट, काळ्या रंगाचा टॉप परिधान केला असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या :