बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा भ्रमनिरास,मनसेने दिलेला पाठींबा केवळ नावापुरताचं

टीम महाराष्ट्र देशा – गेले २ दिवस बेस्ट कर्मचारी संपावर गेले असून त्या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठींबा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्याशी भेट झाली मात्र  बेस्ट कर्मचाऱ्यांचा मात्र  भ्रमनिरास झाल्याचं चित्र आहे. कारण या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या केवळ अडचणी आणि संपा बाबतची कारणे ऐकून घेतली पण त्यावर ठोस भूमिका घेतली नाही.

Loading...

वेतन वाढ , बोनस , बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण या मुद्यांवर बेस्ट कर्मचाऱ्यांनी ७ तारखे पासून संप सुरु  केला आहे. दरम्यान, आज सकाळी ११ वाजता बेस्ट कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेतली. या भेटी वेळी बेस्ट कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय देखील होते. कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांना कर्मचार्यांच्या अडचणी आणि संपा बाबतची कारणे सांगितली. मात्र राज ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली नाही. फक्त कर्मचाऱ्यांनी संघटीत रहा एकजूट रहा असा सल्ला त्यांच्या कडून मिळाला. त्यामुळे या संपाला असलेला पाठींबा हा केवळ नावापुरताच असल्याच दिसून येत आहे.Loading…


Loading…

Loading...