ईदचा उत्साह : पुराने उध्वस्त झालेलं एक संपूर्ण गाव दत्तक घेण्याचा मुस्लीम बांधवांचा निर्णय

blank

टीम महाराष्ट्र देशा : ईद-ऊल-जुहा अर्थात बकरी ईदचा सण आज सर्वत्र भक्तिभावानं साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण म्हणजे त्याग आणि मानव सेवेचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनीही राज्यातल्या नागरिकांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. बकरी ईद हा पवित्र सण पूर्ण श्रद्धा आणि समर्पण भावनेचा संदेश देतो. हा सण साजरा करताना दानधर्म, तसेच उपेक्षित वर्गाच्या कल्याणाचा उदात्त विचार केला जातो, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

बकरी ईद निमित्त सर्वत्र सामुहिक नमाजसह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथं छावणी परिसरातल्या ईदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजता सामुहिक नमाज पठण करण्यात येणार आहे.

दरम्यान कोल्हापूर-सांगली परिसरात मात्र बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. पूरस्थितीमुळे ईदवर केला जाणारा खर्च पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.सातारा जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांच्या बैठकीत पुरात मोठं नुकसान झालेलं एक संपूर्ण गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घर बांधून देण्यापासून ते कपडे आणि जेवणाचा सर्व खर्च उचलण्याचा निर्णय साताऱ्यातील मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या