माध्यम विश्वात खळबळ! ‘दैनिक भास्कर’ समुहाच्या कार्यालयावर आयकर विभागाची धाड

नवी दिल्ली : देशातील प्रसिद्ध माध्यम समूहांपैकी एक असलेल्या दैनिक भास्कर माध्यम समूहाच्या विविध कार्यालयांवर आज आयकर विभागाने धाड टाकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दैनिक भास्कर समूहाच्या नवी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांवर आयकर विभागाच्या पथकांनी कारवाई केली. या कार्यालयांची झाडाझडती सुरू आहे.

दैनिक भास्कर समुहावर कर चोरी प्रकरणात आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. परंतू अर्थ मंत्रालयाचाच महत्त्वाचा भाग असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, भास्कर समूहाच्या कार्यालयांवर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनूसार, दैनिक भास्करच्या ज्येष्ठ संपादकाने सांगितले की, जयपूर, अहमदाबाद, भोपाळ आणि इंदौर कार्यालयात या ग्रुपच्या छापे टाकण्यात आले. उत्तर प्रदेश टेलिव्हिजन चॅनल, भारत संवाद यांच्यावरही छापेमारी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकरच्या पथकाने कर दस्तऐवजांची तपासणी करण्यासाठी लखनऊ कार्यालय आणि संपादकाच्या घराची झडती घेतली.

वाहिन्यांनी केलेल्या “कर घोटाळ्याच्या निर्णायक पुराव्यांनुसार” हे छापे टाकण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. भारत समाचारच्या नुकत्याच झालेल्या अहवालावर यूपी सरकारची टीका झाली आहे. तर दैनिक भास्कर समुहाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी झालेल्यांच्या अनेक वृत्त मालिका प्रकाशित केल्या होत्या. तसेच गंगा नदीत आढळलेल्या मृतदेहांचा पाठपुरावा केला होता.

महत्वाच्या बातम्या 

IMP