खळबळ! चाकण परिसरात एटीएम सेंटरमध्ये स्फोट

एटीएम सेंटर

पिंपरी चिंचवड: पुण्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील आंबेठान गावाजवळील भांबोली फाट्यावर असलेल्या बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये अचानक स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या स्फोटमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. सध्या याठिकाणी पोलिस देखील हजर झाले आहेत.

आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, एटीएम सेंटरचे दरवाजे दूर फेकले गेले आणि एटीएम मशीन ही जळाली आहे. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला आहे? याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही.

दरम्यान हा स्फोट चोरीच्या उद्देशाने केला गेला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. सध्या अनेक वेळा चोरीच्या उद्देशाने एटीएम मशीन फोडणे असे अनेक प्रकार समोर आले आहेत. यावरूनच हा अंदाज लावण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून लवकरच याचे खरे कारण समोर येईल.

महत्त्वाच्या बातम्या

IMP