७२ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात

टीम महाराष्ट्र देशा : ७२ व्या स्वतंत्रदिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लालकिल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर मोदींंनी देशाला संबोधीत केलं. २०१९ पूर्वी मोदींचं लाल किल्ल्यावरील हे शेवटचं भाषण झालं. बाजपा अध्यक्ष अमित शहा तसेच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतर नेते ही यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, मुंबईत राज भवनामध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात झेंडा वंदन होईल. मुंबईतील मुलुंडमधील संभाजी मैदानावर मध्यरात्री ठीक १२ वाजता ध्वजारोहण करण्यात आलं. गेल्या १७ वर्षापासून म्हणजे कारगिल युद्धापासून या ठिकाणचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यानंतर शहींंदांंना श्रद्धांजली वाहिली जाते. शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांनी हा कार्यक्रम आयोजीत केला होता. यावेळी अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.