निवडणुकांमध्ये पैशाचा अतिरेकी वापर – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा: ‘अलीकडच्या काळात निवडणुकांमध्ये पैशाचा अतिरेकी वापर होत असून ही चिंतेची बाब आहे. बऱ्याचदा निवडणुकानंतर काही उमेदवारांकडून प्रत्येक मतदानासाठी अमुक इतके पैसे देण्यात आल्याची भाषा कानावर पडते. त्यावेळेस चिंतेत अधिक भर पडते. अशी चिंता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

राज्य निवडणूक आयोगातर्फे लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत असून, लोकशाही, निवडणुका आणि सुप्रशासन या विषयावर राज्य निवडणूक आयोगातर्फे आयोजित एकदिवसीय परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही खंत बोलून दाखवली आहे. तर पैशांचा हा वापर थांबविला पाहिजे अशी आग्रही भूमिका सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडली.