टीम महाराष्ट्र देशा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनात चहा Tea चे सेवन अधिकाधिक वाढत चालले आहे. चहाप्रेमी Tea Lover तर तुम्ही पाहिलेच असाल. तर काही लोकांची चहा मिळाल्याशिवाय दिवसाला सुरुवातच होत नाही. काही लोक तर इतके चहा-वेडे असतात की त्यांना दर तासाला चहा लागतो. तर काहींना चहा पिऊन एनर्जी मिळते. तर काही लोकांना चहा घेतल्यावर टेन्शन पासून आराम मिळतो. पण तुम्हाला माहित आहे का जास्त चहा पिल्याने आपण स्वतःच अनेक आजारांना आमंत्रण देतो. होय, तुम्ही बरोबर वाचले चहामुळे आपण अनेक आजारांना स्वतःहून आमंत्रण देतो. या बातमीच्या माध्यमातून अति चहाचे सेवन केल्याने कोणते आजार होऊ शकतात याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
चहा चे सेवन केल्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता अधिक असते
तुम्ही जर दिवसातून एक ते दोन वेळा चहा घेत असाल तर त्याने तुमच्या आरोग्याला कोणतेही परिणाम होणार नाही. दिवसाला दोन ते तीन कप पेक्षा जास्त चहाचे सेवन करत असाल तर तुमच्या शरीरात ब्लडप्रेशरचा धोका वाढू शकतो. त्यामध्ये जर तुम्हाला आधीच ब्लड प्रेशर चा त्रास असेल तर डॉक्टर तुम्हाला अजिबात चहा पिऊ नका असा सल्ला देतात.
अति चहा पिल्याने हृदय रोगाला आपण आमंत्रण देतो
ब्लड प्रेशर चा संबंध थेट ह्रदययाशी येतो. त्यामुळे शरीराच्या ब्लडप्रेशर परिणाम झाला तर, परिणामी आपल्या हृदयाचे देखील नुकसान होऊ शकते. जेव्हा ब्लड प्रेशर वाढतं तेव्हा हृदय फास्ट ब्लड पंप करतो. यामुळे अनेक ह्रदयचा आकार वाढण्याची शक्यता असते आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता निर्माण होऊ शकतो.
चहाच्या अति सेवनाने शरीरात ॲसिड तयार होते
चहाच्या अतिसेवनामुळे शरीरामध्ये ॲसिडची समस्या निर्माण होऊ लागते. विशेषता सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायला नाही समस्या वाढू शकते. त्यामुळे पचनक्रिया देखील कमकुवत होते. चहाचे जास्त सेवन केल्याने पचनाच्या सर्व अवयवांवर परिणाम होतो.
जास्त चहा पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते
तुम्ही जर चहाचे शौकीन असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते. जास्त चहा पिल्याने शरीरामध्ये डीहायड्रेशनची समस्या उद्भवते.
टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या
- Gunratna Sadavarte । गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून ‘सामना’वर बंदीची मागणी ; काय आहे नेमकं प्रकरण?
- Karan Kundra & Tejasswi Prakash | करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या दिवाळी लूकला चाहत्यांकडून मिळाले भरभरून प्रेम
- Kishori Pednekar । “मे महिन्यात तुम्ही जे फटाके फोडले त्याचे…”; एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर पेडणेकरांचा टोला
- Soler Eclipse | सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी काय करावे, जाणून घ्या!
- Aurangabad | अब्दुल सत्तारांचा दौरा संपताच पंचनामे करणारे पथक देखील गायब