भाजप-सेना युतीत संजय राऊत अडसर- सुधीर मुनगंटीवार

sudhir mungantiwar vr sanjay raut

मुंबई: शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत अजूनही शंका व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना भाजपबरोबर असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा भाजप-सेना युती संदर्भात बोलले होते. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या दोन्ही नेत्यांनी केलेली  विधाने  खोडून काढले होते.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘संजय राऊत हे युतीत अडसर ठरत आहेत, राऊत वगळता सेनेचे इतर सर्व नेते भाजप-सेना युतीसाठी तयार आहेत. युतीसाठी आम्ही काल ही सोबत होतो ,पुढेही सोबत राहू, शेवटी निर्णय शिवसेनेचा, युती जबरदस्तीने होत नाही, भाजपने आपली भूमिका व्यक्त केली आहे शिवसेना युती करणार की नाही हे शिवसेनेला विचारावं. यावरून भाजप-सेना यांच्यामध्ये चांगलाच राजकारण तापल्याचे स्पष्ट होते.

संजय राऊत यांनी सुद्धा अर्थमंत्र्यांच्या विधानाला उत्तर दिले. संजय राऊत म्हणाले, शिवसेनेला संपवण्याची वक्तव्य कुणी केली. त्याची उत्तर त्या-त्या पक्षाच्या कार्यकर्त्याने दिले पाहिजे. गेली ४-५ वर्षे भाजपच्या नेत्यांचा शिवसेनेसंदर्भातील उद्दामपणा दाखवून झाला आहे. पण यापुढचे दिवस फक्त शिवसेनेचे आहेत. मुनगंटीवार हे चांगले गृहस्थ पण त्यांचा अभ्यास कमी पडतो आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी लाट असताना, भाजपने साथ सोडली. त्यावेळी आम्ही युतीसाठी आम्ही प्रयत्न केले होते.