पुणे : देशात कोरोनाने थैमान घातले होते. कोरोनाची लाट अद्याप ओसरलेली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवण्यात आली आहे. देशात अनेक जिल्ह्यांनी कोरोना लसीकरणाचा 100 टक्के टप्पा पार केला आहे. पुणे जिल्ह्यातील जवळपास 443 गावांतील नागरिकांचे डोस पूर्ण केल्याने काही गावे 100 टक्के लसवंत झाली आहेत.
लसीकरण मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने हा टप्पा पार झाला आहे. पुणे जिल्ह्यातील जवळपास 443 गावांतील नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण केल्याने ही गावे 100 टक्के लसवंत झाली आहेत. वाढत्या लसीकरणामुळे जिल्ह्याचा कोरोनाबाधित आणि मृत्यूदरातही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात लसीकरणाच्या बाबतीत पुणे जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात 134 गावे 100 टक्के लसीकरण झाले आहे.
दरम्यान, वेल्हे तालुक्यात 54, भोरमध्ये 41, तर इंदापूर तालुक्यात 38 गावात देखील 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. जुन्नर आणि पुरंदर तालुक्यात सर्वात कमी लसीकरण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- एसटी संप चिघळला; उस्मानाबादमध्ये आगार व्यवस्थापकास मारहाण
- ठाकरे सरकारचा यू-टर्न; दोन लाखांवरील शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही
- …तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील- मुख्यमंत्री ठाकरे
- दक्षिण आफ्रिकेतून स्वदेशी परतलेल्या व्यक्तीला नव्या व्हेरिएंटचा संसर्ग?
- कायदे मंजूर करताना परिणामांचा विचार न केल्याने समस्या- एन.व्ही.रमण