परिक्षक आर्या आंबेकर का भडकली

aarya

मुंबई : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या सिंगिंग रियालिटी शोमधून आर्या आंबेकर हे नाव घराघरात पोहंचले आहे. तिने अनेक चित्रपट आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. चित्रपटसृष्टीतील एका गायक आणि संगीतकारास डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र या अफवांवर भडकली आणि एका पोस्टद्वारे उत्तर देत तिने सोशल मीडियावर याबद्दल खुलासा केला आहे.

आर्या पोस्टमध्ये फोटो शेअर केला आहे. त्यात ती म्हणाली मला बरेच मॅसेज आले आहेत, ज्यात इंटरनेटवर असलेल्या फेक न्यूजवर मला बऱ्याच गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. गेल्या बारा वर्षांपासून कोणतीच टॅलेंट एजेन्सी मॅनेज करत नाही. इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवरील माझे फॉलोव्हर्स ऑर्गेनिक आहेत. मी नावाजलेल्या व्यक्तीला डेट करत असल्याची अफवा बऱ्याच काळापासून ऐकत आहे, मात्र ते माझे मेंटॉर असून त्यांच्या बद्दल आदर असल्याचं ही तिने सांगीतले.

आर्या आंबेकर हिने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, यापूर्वी मी या चर्चांकडे दुर्लक्ष केले. मात्र नुकत्याच प्रश्नोत्तरांमध्ये मला यासंदर्भात मॅसेज आला होता. माझ्या ओळखींच्या व्यक्तींबद्दल बोलत असल्याचे कळले त्यामुळे हा मुद्दा स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला.

महत्त्वाच्या बातम्या