परीक्षा पद्धत साधी व सोपी, विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नये- प्राजक्त तनपुरे

prajakt tanpure

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:– सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर विद्यापीठांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहे. परीक्षा पद्धत ही साधी व सोपी असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नका, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी आज पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा केली व त्यानंतर ही माहिती दिली आहे.

प्राजक्त तनपुरे म्हणाले की, आज पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा केली. परीक्षा घेण्याची पद्धत सोपी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना घरीच शक्य होईल अशी असावी अशा सुचना केल्या. तसेच मुख्य परीक्षेच्या आधी कमीत कमी २ ते ३ सराव परीक्षा होतील असे कुलगुरूंनी स्पष्ट केले. जर विद्यार्थ्यांना ४० प्रश्न सोडवायचे असतील, तर त्यानां ५० प्रश्न दिले जातील, आणि त्यातले ४० सोडवावे लागतील. त्यामुळे घेण्यात येणारी परीक्षा साधी व सोपी असल्याने विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नये, असे राज्यमंत्री तनपुरे म्हणाले.

विद्यार्थ्यांसमोरच्या अडचणी पाहता आणि नवीन परीक्षा पद्धत पाहता, प्रश्नांची पातळी शक्यतो सोपी असावी. परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यावी हे राज्य सरकारच्या हातात नाही. परंतु ही प्रक्रिया साधी, सोपी असावी आणि सुरळीत पार पडावी या करता मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी असणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. तसेच मी इतर विद्यापीठांच्या कुलगुरूंनी बोलणार असल्याचे राज्यमंत्री तनपुरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:-